जिल्हा परिषद पुणे दीड हजार रिक्त पदे भरणार!

0

पुणे :  १ हजार ४८९ रिक्त पदे त्वरित भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी इच्छुकांकडून येत्या १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगा भरती करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक ७०१ जागा या परिचारिकांच्या (स्टाफ नर्स) आहेत. या भरतीत विविध २१ प्रकारची पदे भरली जाणार आहेत.

या रिक्त पदांमध्ये गॅस्ट्रोएन्ट्रोलाॅजिस्ट, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, रुग्णालय व्यस्थापक, सहअधिसेविका, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ब्लॉक समुदाय व्यवस्थापक, तालुका हिशोबनीस, वॉर्डबॉय, बेडसाईट असिस्टंट, रिशेप्सनिष्ट आदींचा समावेश आहे.

ही सर्व पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्वावर भरण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.

या पदांच्या भरतीसाठी फक्त ऑनलाइन अर्ज स्विकारले जाणार आहेत. याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज https://punezp.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अर्जासोबत पाठवावयाची कागदपत्रे :-

– वयाचा पुरावा.

– पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र.

– रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र.

– अनुभव प्रमाणपत्र.

– रहिवासी प्रमाणपत्र.

– जातीचे प्रमाणपत्र.

– एक छायाचित्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here