नाशिक-पेठ महामार्गावर मोटरसायकल्याच्या धडकेत युवक ठार!

0

वेगवान न्यूज / संजय थेटे
उमराळे l गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक – पेठ महामार्गावरील गोळशी फाट्या कडून गोळशी कडे तरुण युवक पायी जात असताना गोळशी येथून येणारा मोटरसायकलस्वार याने पायी चालणाऱ्या युवकाला जोरदार धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले त्यात एक जण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच ठार झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, निचई पाडा येथील युवक गोळशी येथे पाहुणा म्हणून आला होता. संध्याकाळच्या वेळेस फिरण्यासाठी तो नाशिक महामार्ग साईट पट्ट्याने फिरण्यासाठी गेला होता गोळशी येथील येथील रोहिदास पुनाजी टोंगारे या मोटर सायकलने रघुनाथ भुसारे या युवकाला मागुन जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी जखमी झाला. मात्र त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेता असताना प्राणज्योत मालवली.अशी माहिती उमराळे बुद्रुक आऊट पोस्टचे पोलीस नाईक बाळकृष्ण पजई व पोलीस हवालदार संजय गायकवाड यांनी पंचनामा करुन दिली. पुढील तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here