बागलाण हरणबारी धरणात युवकाचा बुडून मृत्यू

0

वेगवान न्यूज /  गणेश सोनवणे

बागलाण ः तालुक्यातील हरणबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या हतनूर येथील १६ वर्षीय अर्जुन विष्णु देशमुख हा युवक तीन मित्रांसोबत शुक्रवारी  (दि.३ ) दुपारच्या सुमारास  घरच्या गुरांना हरणबारी धरणात पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला असता यावेळी त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही.
पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अर्जुन पाण्यातून वरती येत नसल्याने  त्याच्या मित्रांनी ही घटना गावातील ग्रामस्थांना सांगितली असता घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.  घटनास्थळी जायखेडा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे , तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्यासह बचाव पथक दाखल झाले होते.
रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते मात्र  शोधकार्य सुरू असताना आज रोजी सकाळी अर्जुंचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here