लासलगावात कांदा लोडिंग करताना ओव्हरहेड वायरच्या झटक्यामुळे तरुणाचा मृत्यू

0
लासलगाव (समीर पठाण)
लासलगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी (2 जुलै) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारारास कोलकातासाठी कांदा लोडिंग सुरु असताना एका तरुणाला ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका बसला.हा तरुण कांदा लोडिंगसाठी बोगीवर चढत होता.यावेळी त्याला ओव्हरहेड वायरला तीव्र झटका बसला.या झटक्यात हा तरुण ७० टक्के भाजला.या तरुणाचं नाव समाधान नवनाथ क्षीरसागर असून तो नांदूर मध्यमेश्वर येथे वास्तव्यास होता.दरम्यान,निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार
लासलगाव रेल्वे स्थानकावर सध्या कांदा लोडिंगचे काम सुरु आहे.लासलगाव येथून कोलकातासाठी ४० बोगीची रॅक असलेल्या मालगाडीत १६०० टन कांदा भरण्याचे काम सुरु होते. दरम्यान लोडिंग सुरु असताना निफाड येथील कांद्यांनी भरलेला ट्रक कांदा लोडिंगसाठी आला.गाडी ड्रायव्हर सागर पवार आपला ट्रक बोगी जवळ लावत होता.यावेळी त्याच्यासोबत असलेला समाधान क्षीरसागर हा तरुण कांदा लोडिंगसाठी पोल क्रमांक 235/10-12 जवळ उभ्या असलेल्या मालगाडीवर चढू लागला. बोगीवर चढल्यावर त्याला ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका बसला.

समाधानला तातडीने रात्री दहा वाजता निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत तो जवळपास 70 टक्के भाजल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता.अखेर रात्रभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here