‘तुस्सी जा रहे हो, तुस्सी ना जाओ… हा आठवतोय का सिनेमा? हा Cute सरदार अडकणार लग्नाच्या बेडीत…

0

मुंबई l ‘कुछ कुछ होता हैं’ हा सिनेमा लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत पाहिला असेल…तसेच फाॅमेली रोमँटिक सिनेमातील डायलॉगने अनेक चाहत्यांच्या मनावरती परीणाम केला आहे. थिएटरमध्ये, टेलिव्हिजनवर या पिढीने हा सिनेमा कित्येकदा पाहिला आहे आणि आजही पाहिला जातो. या सिनेमातील सर्वच भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहेत. शाहरुख-काजोलपासून फरिदा जलाल-जॉनी लिव्हरपर्यंत सर्वांनीच त्यांचा असा ठसा उमटवला आहे.

सलमानने देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका यामध्ये निभावली होती. या सिनेमात विशेष गाजली ही सर्व बच्चेकंपनी. यामध्ये नेहमी शांत असणाऱ्या क्यूट सरदारची भूमिका परझान दस्तूरने (Parzaan Dastur) केली होती. तारे मोजतानाचा या सरदाराचा क्यूटनेस सर्वांनाच आवडला होता.

हाच क्यूट सरदार आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.’तुस्सी जा रहे हो, तुस्सी ना जाओ..’ हा परझानचा डायलॉग विशेष गाजला होता. त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि आजही त्याच्या गोंडसपणाचं कौतुक केलं जातं. दरम्यान परझानने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावरून त्याच्या लग्नाबाबतची माहिती दिली आहे.

परझान त्याची गर्लफ्रेंड डेल्ना श्रॉफ हिच्याशी फेब्रुवारी 2021 मध्ये लग्नगाठ बांधणार आहे.15 ऑक्टोबर रोजी त्याने सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये परझान डेल्नाला प्रपोज करताना दिसत आहे. ‘तिने जेव्हा मला हो म्हटलं त्या सुंदर वर्षातील थ्रोबॅक फोटो. #TheDASHwedding साठी केवळ 4 महिने शिल्लक’, अशी कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे.परझानने 2009 मध्ये आलेल्या पियूष झा यांच्या सिकंदर सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here