‘या’ स्टारने घेतला निरोप ! बॉलिवूडला आणखी एक धक्का…

0

मुंबई l लॉकडाऊन काळात आणखी एका हिंदी चित्रपट सृष्टीतील व्यक्तीचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर्षी अनेक बॉलिवूड स्टार्सचे दुःखद निधन झाले आहे. यामुळे चाहत्यांसह त्यांच्या सहकलाकारांना धक्का बसत असून आता आणखी एका प्रसिद्ध स्टारचे निधन झाले आहे.

बॉलिवूड मधील साहस दृश्यांच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या जाणाऱ्या परवेज खान या ऍक्शन डिरेक्टरचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी, म्हणजेच २७ जुलै २०२० रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाच्या एक दिवस आधी रात्रीच्या वेळी त्यांच्या छातीत अचानक वेदना जाणवू लागल्या. ज्यानंतर सकाळी तातडीनं त्यांना रुग्णालयात नेण्यात आली. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भात झी २४ तासने वृत्त दिले आहे.

‘अंधाधुन’, ‘बदलापूर’, ‘बुलेट राजा’, ‘फुकरे’, ‘रा वन’, ‘विश्वरुपम’, ‘विश्वरुपम 2’, ‘देव डी’, ‘गँगस्टर’, ‘अब तक छप्पन’, ‘द लेजेंड ऑफ भगत सिंग’, ‘सोल्जर’, ‘मिस्टर ऍन्ड मिसेस खिलाडी’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं होतं. परवेज यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असं कुटुंब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here