‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा… म्हणाली आदित्य ठाकरे दिशा सलियानच्या…

0

मुंबई – सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणी ड्रग्स कनेक्शन सापडल्याने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.नक्की त्याने आत्महत्या का केली याचे ठोस कारण सीबीआयला सापडलेले नाही.आता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. त्यातला त्यात त्याची मॅनेजर दिशा सालियान हिचे मृत्यू प्रकरणही पेटलेले आहे.

आता याच मृत्यू प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा अभिनेत्री नुपूर मेहता हिने केला आहे.रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला आहे की, दिशा सलियानच्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते.

आता या खुलाश्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिशा सालीयान ही सुशांतची मॅनेजर होती.सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेवर नेहमीच लोकांनी शंका उपस्थित केली आहे.

अनेकजण तर या प्रसंगाला सुशांतच्या मृत्यूशी जोडून बघतात. काही दिवसांपूर्वी भाजप नेते निलेश राणे यांनीही हाच आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर केला होता.सरकारला माहीत आहे की, आदित्य ठाकरे फसलेले आहेत आणि त्यांच्या सरकारमधील काही मंत्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या मुलाखतीत पन्नास वेळा सांगितले आहे की, आदित्य ठाकरे यांचा सुशांतच्या प्रकरणात हात आहे.

आजपर्यंत 50 दिवसांत या लोकांनी पुरावे बदलले असतील किंवा नष्ट केले असतील. मला अजून त्याची पूर्ण माहिती नाही पण चौकशीमध्ये सगळं काही बाहेर येईल. पण मला मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे बॉलीवूडच्या बऱ्याच पार्ट्याना जात होते.

दिशा सलियान आणि सुशांतच्या मृत्यूबाबत नक्की आदित्य ठाकरेंना काहीतरी माहीत आहे. पण हे सामूहिक पद्धतीने लपवले जात आहे. असा आरोप निलेश राणे यांनी लावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here