चित्रपट निर्माता अनुराग कश्यप अडकणार ? अभिनेत्रीने केला बलात्काराचा गुन्हा दाखल

0

मुंबई l मंगळवारी रात्री चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित अभिनेत्रीने याबाबत लेखी तक्रार दिली होती.

पीडितेने तिचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यासोबत वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन कश्यपविरोधात लेखी तक्रार दिली. याप्रकरणी वर्सोवा पोलीस आधिक तपास करत आहेत.

अनुराग कश्यपविरोधात बलात्कार तसेच अन्य गंभीर कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार रात्री उशीरा कश्यपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी सांगितले.

२०१४-१५ मध्ये हा प्रकार घडल्याचे तिचे म्हणणे आहे.जेव्हा ‘फ्रीडम’ या चित्रपटादरम्यान पीडित अभिनेत्रीची भेट कश्यपसोबत झाली होती. त्यावेळी तो ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. तिने कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीना घडलेला प्रकार सांगितल्यावर याबाबत वाच्यता करू नको असा सल्ला तिला त्यांच्याकडून देण्यात आला. तसेच टिष्ट्वटरवरील पोस्ट घरच्यांनी तिला डिलीट करायला लावली असे तिचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here