कार रेसिंगच्या दुनियेला मागे टाकून पॉर्नस्टार बनलेली रेनी ग्रेसी एक आरोप करत हिंदुस्थानी नेटकऱ्यांवर चिडली आहे. तिने तिच्या एका पोस्टमध्ये तिच्या पेजपासून हिंदुस्थानी युजर्सनी दूर राहावे, असं सांगितलं आहे.
काय करायचा हिंदुस्थानी नेटकरी तिच्या फोटो सोबत ?
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रेनी ग्रेसी हिने आरोप केला आहे की, हिंदुस्थानी नेटकरी तिच्या फोटो आणि संबंधित आशयाचा गैरवापर करत आहेत.
तिच्या फोटो अगर तत्सम आशयाच्या वापरासाठी तिची परवानगी घेतली जात नाही. तिच्या परवानगीशिवाय तिचं एक पेज बनवण्यात आलं आहे. तसंच त्याच्यावर तिचे फोटो आणि अन्य आशय शेअर केले जात आहेत. तिच्या म्हणण्यानुसार त्यावर तिचा अधिकार आहे. त्यामुळे तिचे व्हिडीओ किंवा फोटो यांना बेकायदेशीर पद्धतीने शेअर करणं बंद करा, असं तिचं म्हणणं आहे. मला आता हिंदुस्थानी पसंत नाहीत, जर तुम्ही हिंदुस्थानी असाल तर कृपया माझ्या पेजपासून दूर राहा. इथे कुणीही तुमचं स्वागत करणार नाही. मी आज माझ्या पेजवरून सगळ्या हिंदुस्थानींना हटवत आहे, असं तिने म्हटलं आहे. ही पोस्ट तिने ओन्ली फॅन्स नावाच्या एका पेजवर लिहिली आहे.
कोण आहे रेनी ग्रॅसी
रेनी ग्रॅसी ही 2015 साली ऑस्ट्रेलियाची पहिली फुल टाईम महिला कार रेसर बनली होती, मात्र लवकरच तिला इतर महिला ड्रायव्हरनं मागे टाकलं आणि आता तिला या खेळासाठी कुणीही स्पॉन्सर मिळत नव्हते. ऑस्ट्रेलियाची 25 वर्षीय रेनी ग्रॅसी V8 सुपरकार ड्रायव्हर होती. या खेळातून रेनीचा इतकी कमाई होत नव्हती, जितक्या कमाईची तिनं अपेक्षा ठेवली होती. मग मात्र तिनं पॉर्न स्टार व्हायचा विचार केला आणि आता ती पॉर्न स्टार बनून 25 हजार डॉलर म्हणजे जवळपास 19 लाख रुपये दर आठवड्याला कमावते