कोण होता विकास दुबे?

0

कोण होता विकास दुबे?

कानपूरच्या चौबेपूर पोलीस ठाण्यात विकास दुबेवर जवळपास 60 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते.

त्यावेळी पोलिसांच्या पथकावर त्याच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.

कानपूरच्या चौबैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरु गावात हा प्रकार घडला. दुबेच्या घराला तटबंदी असून पोलिसांची कोंडी करुन त्यांच्यावर दुबेच्या गुंडांनी हल्ला केला.

विकास दुबे हा अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता. त्यामुळे तो आजपर्यंत पकडला गेला नाही. विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून भाजप नेते आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. संतोष शुक्ला हत्या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली होती.

कसा पकडला गेला विकास दुबे ?

गुरुवार 9 जुलै – सकाळी साडेसात वाजता – दर्शन घेण्यासाठी विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात पोहोचला आणि दर्शन घेतले. एका दुकानदाराने विकास दुबे याला ओळखले, त्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांना कळवण्यात आले. यानंतर स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.

विकास दुबेने पोलिसांशी हुज्जत घातली ?

सकाळी आठ वाजता – जेव्हा पोलीस मंदिराबाहेर आले, तेव्हा त्यांनी विकास दुबेकडे चौकशी केली, त्याचे ओळखपत्र मागितले. पण तो देऊ शकला नाही.

मी विकास दुबे आहे ?

सकाळी साडेआठ वाजता – पोलिसांनी विकास दुबेला पकडले. तेव्हा तो जोरात ओरडत होता की मी विकास दुबे आहे, कानपूरवाला.

गुरुवार 9 जुलै – संध्याकाळी सात वाजता – विकास दुबेला मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशला आणण्याची कायदेशीर प्रक्रिया गुरुवारी संध्याकाळी सुरु. यूपी एसटीएफची टीम त्याला घेऊन कानपूरला रवाना.

शुक्रवार 10 जुलै – पहाटे 6.15 वाजता – एसटीएफच्या ताफ्यातील महिंद्र Tuv पहाटे सव्वासहा वाजताच्या सुमारास भौती भागात रस्त्यावर उलटली.

पहाटे 6.18 वाजता – अपघाताचा गैरफायदा घेऊन 6 वाजून 18 मिनिटांनी विकास दुबेने पोलिसांच्या बंदुकीसह पळ काढल्याचा पोलिसांचा दावा

पहाटे 6.19 वाजता – पोलिसांचे दुबेला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन, मात्र दुबेने पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप

पहाटे 6.20 वाजता – दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु, 10 ते 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या.

पहाटे 6.40 वाजता – विकास दुबेचा मृत्यू

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here