WHO नं दिला धोक्याचा इशारा ! लस येईपर्यंत जगात ही असेल स्थिती?

0

नवी दिल्ली l कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता 20 लाखांपर्यंत पोहोचू शकते असा दावा WHO कडून करण्यात आला आहे. कोरोनावर लस येण्याआधी आणि लस आल्यानंतरही जगभरात ही लस नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळा लागू शकतो.

या कालावधीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 20 लाखांपर्यंत पोहोचू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जगभरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येते की काय अशी एकीकडे भीती असतानाचा आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)ने आणखीन एक धक्कादायक दावा केला आहे. कोरोनाचा वाढणारा हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. नाहीतर याचे परिणाम येत्या काळात अत्यंत गंभीर होतील आणि मृत्यूचा आकडा वाढेल जे धोकादायक आहे असंही WHOनं म्हटलं आहे.

जगभरात 3 कोटी 27 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनाची दुसरी लाट काही देशांमध्ये येत असल्यानं जागतिक पातळीवर या विषाणूसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.

यासाठी युवकांना किंवा तरुणांना कोणताही दोष देण्यात अर्थ नाही. घरी होणारे कौटुंबिक गेट-टू गेदर, पार्टी यामुळेही कोरोनाचं संक्रमण वेगानं वाढू शकतं. पार्टी अथवा कौटुंबिक कार्यक्रम छोट्या स्तरावर असले तरीही त्यामध्ये घरातल्या सर्व वयोगटाचे लोक सहभागी असतात त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अशावेळी वेगानं पसरणं अधिक धोक्याचं असतं असंही यावेळी WHOचे मायकल रायन यांनी म्हटलं आहे.कोरोनाचे अमेरिकेत 2 लाख 8 हजारांहून तर भारतात 85 ते 93 हजारहून अधिक ब्राझीलमध्ये 1 लाख 40 हजारहून अधिक दिवसाला नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.

कोरोनाच्या यादीत भारताचा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या काय आहे भारतातील कोरोनाची स्थिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या आकडेवारीनुसार भारतात 24 तासांत 85 हजार 362 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 लाखांवर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here