WHO ची माहिती ! वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर प्रभावी लस तयार होणार ?

0

नवी दिल्ली l जगभरातील अनेक देशांतील संशोधकही कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच, डब्ल्यूएचओने जारी केलेल्या एका वक्तव्यामुळे आशेचा किरण दिसत आहे.

या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्यीची शक्यता असल्याचं WHO च्या वतीने सांगण्यात आलं आहे.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे सध्या लोकं कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीची वाट पाहत आहेत.डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी कोरोना महामारीसंदर्भात सुरु असलेल्या एका बैठकीत बोलताना सांगितले की, आम्हाला आशा आहे की, ज्या वॅक्सिनची वाट संपूर्ण जग पाहत आहे, ते वॅक्सिन या वर्षाअखेरपर्यंत तयार होणार आहे. तसेच त्यांनी दावा न करता अशी आशा असल्याचं सांगितलं आहे.दरम्यान, डब्लूएचओच्या नेतृत्त्वात येणारी COVAX ग्लोबल वॅक्सीनच्या जवळपास 9 प्रकारच्या वॅक्सिनवर काम सुरु आहे.

ज्या चाचण्यांमधून त्यांचे परिणाम चांगले दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच वॅक्सिनचे परिणाम असेच येत राहिले तर यावर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल अशी आशा डब्लूएचओने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here