तुम्ही वापरत असलेलं WhatsApp तुमचे बँक खाते रिकामे करू शकते !

0

मुंबई । स्टेट बँक ऑफ इंडिया वारंवार आपल्या ग्राहकांना अलर्ट करत असते.यात आॅनलाईन,तसेच एटीएम, युपीआय फ्रॉड बाबत अलर्ट जारी करते.मात्र SBI ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार आता बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत.

या माध्यमातून ते लोकांची बँक अकाउंट रिकामे करीत आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर केलेली ही छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यात अडथळा आणू शकते. वास्तविक, सायबर गुन्हेगार हे कॉल करून किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज करून आपल्या बँक खात्यातून पैसे उडवू शकतात. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील पोस्टमध्ये WhatsApp Scam विषयी डीटेल्स शेअर केले आहे.

कशी होते लोकांची फसवणूक?

सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेजद्वारे ग्राहकांशी संपर्क साधतात. ही फसवणूक करण्यासाठी ते ग्राहकांना त्यांनी लॉटरी किंवा बक्षीसे जिंकली आहेत असे सांगतात. यानंतर, ते ग्राहकांना फेक SBI क्रमांकावर कॉल करण्यास सांगतात.

हे सायबर गुन्हेगार ग्राहकांना सांगतात की, बक्षीसाचे पैसे मिळविण्यासाठी आपल्या बँकेची डीटेल्स शेअर करणे अनिवार्य आहे. ते ग्राहकांना आश्वासन देतात की, केवळ या डीटेल्सच्या माध्यमातून पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. SBI ने आपल्या ग्राहकांना स्पष्टपणे सांगितले आहे की, बँक कोणतीही लॉटरी योजना किंवा लकी ड्रॉ चालवित नाही. किंवा बँक कोणत्याही प्रकारचे गिफ्ट देत नाही. म्हणूनच ग्राहकांना या बनावट कॉलवर किंवा व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर अवलंबून राहू नका.

SBI ने आपल्या ग्राहकांना सांगितले की, बँक कधीही ग्राहकांना कॉल करत नाही आणि त्यांच्या बँक खात्याच्या पर्सनल डीटेल्स विचारत नाहीत.

अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती जर व्हॉट्सअॅप कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे तसेच फोन व ईमेलद्वारे अशी माहिती विचारत असतील तर तत्काळ सावध राहा. कदाचित आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असेल.SBI ने सर्व ग्राहकांना अशा फसवणूकीपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला SBI ने ग्राहकांना ईमेल फिशिंगबाबत सावध राहण्यास सांगितले होते.

कशी टाळालं फसवणूक !

१) सार्वजनिक Wi-Fi वर आपले नेटबँकिंग अकाउंट लॉग इन करू नका. हॅकरने नेटवर्कला इनफेक्टेड केल्याची आणि आपली पर्सनल डिटेल्स हॅक होण्याची शक्यता आहे.

२) कोणाबरोबरही तुमचे बँक डीटेल्स, पिन कोड किंवा पासवर्ड शेअर करू नका. कोणालाही आपला ID कार्ड फोटो, क्रेडिट कार्ड किंवा सेंसिटिव डॉक्यूमेंट देऊ नका.

३) अनावश्यक लिंक्स, इमेज, GIFs इत्यादीवर क्लिक करणे टाळा.

४) जर कोणी तुमच्याकडून वैयक्तिक माहिती विचारत असेल आणि लॉटरी वगैरे बद्दल बोलत असेल तर बँकेशी संपर्क साधा. बँक कर्मचारी आपल्याला कधीही OTP किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here