रियाला तुरुंगात कोणत्या प्रकारचं जेवण मिळतंय !

0

मुंबई l दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांखाली एनसीबीने मंगळवारी अटक करण्यात आली आहे.मुंबई मधील भायखळा तुरुंगात रियाची रवानगी करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर रियाला सामान्य बॅरेक मध्ये ठेवण्यात आलं होतं. पण नंतर सुरक्षेच्या कारणास्तव रियाला वेगळ्या बॅरेकमध्ये पाठवण्यात आले.

याच कारागृहात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीदेखील आहे. अटक झाल्यानंतर रिया सामान्य बॅरेक मध्ये ठेवण्यात आलं होतं. पण नंतर सुरक्षेच्या कारणास्तव रियाला वेगळ्या बॅरेकमध्ये पाठवण्यात आले.

रियाची रवानगी तुरुंगात झाल्यानंतर आता रियाला तुरुंगात पहिल्या दिवशी कोणतं जेवण देण्यात आलं हे देखील समोर आहे. रियाला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आलं आहे.तिला एक चादर, बेडशीट, चटई आणि सामान ठेवण्यासाठी एक पिशवी देखील देण्यात आली आहे.

तसंच रियाला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच जेवण देण्यात येत आहे. या जेवणामध्ये दोन पोळ्या, एक वाटी भात, एक वाटी वरण आणि एक भाजी यांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे तुरुंगात कैद्यांसाठी उपहारगृह सुद्धा आहे. त्यामध्ये बिस्कीट्स किंवा अन्य खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here