कंगना रणौत प्रकरणावर आम्ही आता बोलणार नाही ! मात्र घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर आमची नजर – संजय राऊत

0

नवी दिल्ली l संसदेच्या अधिवेशनासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दिल्लीत पोहोचले.त्यावेळी तिथे बोलतांना त्यांनी मात्र सूचक इशारा दिला आहे.कंगना प्रकरणावरून महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं आहे. मात्र आता शिवसेनेने या विषयावर बोलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. हा विषय आमच्यासाठी बंद झाल्याचंही म्हटलं होतं.

संजय राऊत म्हणाले, कंगना रणौत प्रकरणावर आम्ही आता बोलणार नाही. मात्र या प्रकरणावर सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडींवर आमचं बारीक लक्ष आहे. कोण काय करतं याची आम्ही नोंद ठेवतो आहोत.

या मागे कुठला पक्ष आहे, व्यक्ती आहे, त्यांचा उद्देश काय आहे याची आम्हाला माहिती आहे असंही राऊत यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here