आता कोरोनाने पाण्यालाही सोडले नाही? पाण्यातून होतो कोरोना… शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

0

मॉस्को l कोरोनाविषाणू ने जगात थैमान घातले आहे. कोरोना ची लस अद्याप उपलब्ध झाले नसल्याने कोरोना विषाणूबाबत सातत्याने नवी नवी माहिती समोर येत आहे.

आधी असे म्हटले जात असे की हा विषाणू जड आहे आणि हवेत अधिक काळ न राहता कुठल्या तरी पृष्ठभागावरच पडतो. मात्र, कालांतराने तो हवेतूनही बरेच अंतर पुढे जाऊ शकतो असे म्हटले गेले व नेहमीप्रमाणेच आधी ‘नाही-होय’ करून जागतिक आरोग्य संघटनेने त्याची पुष्टी केली.

‘टॅस’ या रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ..मात्र आता पाण्यात हा विषाणू किती काळ जिवंत राहू शकतो याबाबतही संशोधन करण्यात आले आहे.संशोधकांच्या मते, कोरोना विषाणू पाण्यातही काही काळ राहू शकतो. मात्र, पाण्यातच त्याचा नाशही होतो. ‘वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी’च्या संशोधकांनी कोरोना विषाणू पाण्यात किती वेळ राहतो याचा अभ्यास केला.या संशोधकांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूचा पाण्यात नाश होणार की नाही हे पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते.

रूम टेम्परेचर असलेल्या म्हणजे सामान्य तापमानाच्या पाण्यात हा विषाणू 24 तासांत 90 टक्के मरतो आणि 72 तासांत 99.9 टक्के म्हणजे पूर्णपणे मरतो. पाणी उकळले तर तो पूर्णपणे नाश पावतो. प्रत्येकाने पाणी उकळून प्यावे असे आवाहन वारंवार केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here