VIDEO: आवाज येत आहे म्हणून खोदली कबर आणि समोर आला भयंकर प्रकार

1

इस्लामाबाद l जेव्हा कब्रस्तानातून कोणाचा आवाज ऐकू आला तर? असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना पाकिस्तानात घडली आहे. कबरीमधून आवाजत येत असल्याचं माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर पोलीस आणि काही व्यक्तींनी कबर खोदली तर त्यातून जिंवत व्यक्ती बाहेर आला आहे.

काय घडलं होतं त्यावेळी ?

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एक व्यक्ती कबरीस्तानकडे जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो खोदलेल्या कबरीच्या खड्ड्यात पडला. या खड्ड्यात माती जमा झाली. गुदमरल्यामुळे खड्ड्यात पडलेला व्यक्ती बेशुद्ध झाला होता. काही वेळानं जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा मदतीसाठी विनवणी करू लागला.

त्याच्या आवाजामुळे आजूबाजूनं जाणाऱ्या व्यक्ती घाबरून गेल्या. कबरीतून आवाज कसा येतो हा प्रश्न पडला. स्थानिकांनी धाडस करून अखेर कबर खोदली तर त्यातून जिवंत तरुण बाहेर आला. हा अजब प्रकार पाहून काही वेळ स्थानिक आणि पोलीसही गोंधळले. दरम्यान पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे सगळीकडे चिखल झाला होता. त्यामुळे तरुणाचा पाय घसरल्यानं तो खोदलेल्या कबरीत पडला होता. दरम्यान स्थानिक आणि पोलिसांनी या तरुणाला बाहेर काढल्यानं जीव वाचला आहे नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here