अमेरिकेने कोरोना लसीची केली किंमत जाहीर…

0
FILE - In this Monday, July 27, 2020 file photo, a nurse prepares a shot as a study of a possible COVID-19 vaccine, developed by the National Institutes of Health and Moderna Inc., gets underway in Binghamton, N.Y. Who gets to be first in line for a COVID-19 vaccine? U.S. health authorities hope by late next month to have some draft guidance on how to ration initial doses, but it’s a vexing decision. (AP Photo/Hans Pennink)

वाशिंग्टन l भयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात अजूनही आहे. कोरोनाविषाणू रोखण्यासाठी अनेक देश युद्धपातळीवर काम करत आहे.

तसेच सध्या कोरोनाची लस नक्की कधी उपलब्ध होणार?, लसीसाठी किती पैसे मोजावे लागणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी कोविशिल्ड लसीचे डोस ५०० रुपयांत मिळणार असल्याचे समोर आले होते. आता अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने देखील लसीची किंमत जाहीर केली आहे.

मॉडर्ना कंपनीने सांगितले आहे की, ‘सरकारकडून एका डोससाठी कंपनी १ हजार ८५४ पासून २ हजार ७४४ रुपये घेईल. तसेच किती प्रमाणात लसीची ऑर्डर दिली जाईल, त्याप्रमाणे किंमत ठरवली जाईल.’ याबाबत कंपनीचे सीईओ स्टीफन बँसेल यांनी दिली आहे.

स्टीफन बँसेल यांनी सांगितले की, ‘त्यांच्या लसीची किंमत फ्यू शॉटप्रमाणे असेल, ज्याची किंमत १० ते ५० डॉलर दरम्यान असेल.’ लसीच्या कोट्यावधी डोससाठी युरोपियन युनियनला मॉडर्नासोबत डील करायचे आहे. युरोपियन युनियनला हे डीलचे २५ डॉलर्सवर काम करायचे आहे.

याबाबत कंपनीसोबत झालेल्या चर्चेत सामील असलेल्या युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.याबाबत बँसेल म्हणाले की, आतापर्यंत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही आहे. पण आम्ही युरोपियन युनियन सोबत होत असलेल्या डीलच्या जवळ आहोत.

कंपनीला ही लस युरोपमध्ये पोहोचवायची आहे. याबाबत सकारात्मक बातचित सुरू आहे. काही दिवस आहेत, आणखी काँट्रॅक्ट होतील.’ दोघांमध्ये जुलैपासून बातचित सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच मॉडर्ना कंपनीने आपली लस ९४.५ टक्के प्रभावी ठरल्याचे जाहीर केले होते. या व्यतिरिक्त फायझरने आपली लस ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला होता. या दोन्ही कंपन्यांचे दावे सध्याच्या आकड्यांच्या अंतिम विश्लेषणावर आधारित आहे.

अजूनही अंतिम रिपोर्ट येणे बाकी आहे. फायझरच्या लसीसाठी ७० डिग्री सेल्सियस आणि मॉडर्नाच्या लससाठी २० डिग्री सेल्सियस कोल्ड चेन तापमान राखणे आवश्यक आहे जे एक मोठे आव्हान आहे.
दोन्ही लसींना वापरण्यास पुढच्या महिन्यापर्यंत परवानगी दिली जाऊ शकते. वर्षाच्या अखेरीस दोघांच्याही ६ कोटींहून जास्त डोस उपलब्ध असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here