उर्मिला मातोंडकर संतापली ! कंगनाला लोकांच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी ?

0

मुंबई l अभिनेत्री उर्मिला मातोंडकर कंगनाला दिलेल्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून संतापली आहे. जनतेच्या पैशातून तिला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी, असा सवाल तिने केला आहे.उर्मिलाने आज एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कंगनाचा समाचार घेतला.

मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतबद्दलचा संताप वाढत चालला आहे.उर्मिला मातोंडकर म्हणतात ‘या मॅडमना काय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देते? तुमच्या आमच्यासारखा माणूस जो ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही.

त्या करदात्यांच्या पैशातून हिला काय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली, ती काय म्हणून दिली गेली?’ अशी विचारणाच उर्मिलाने केली.’इंडस्ट्रीतल्या ड्रग माफियांची माहिती अंमली पदार्थ विभागाला देण्याचा दावा तिने केला होता. मुंबईसारख्या ‘भयाण’ ठिकाणी न येताही ती तू इंटरनेट, फोन, मेलवरून देऊ शकली असतीस. मग आलीस कशाला? चिथवायला, अशा शब्दांत उर्मिलाने संताप व्यक्त केला.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर असून नुकसान भरपाई पोटी पालिकेने आपल्याला 2 कोटीची भरपाई द्यावी अशी मागणी करत अभिनेत्री कंगना राणावत हिने हायकोर्टात धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here