सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींची बिनविरोध निवड

0
( छायाचित्र: दिपक सुर्यवंशी, सटाणा )
सटाणाः
कृषी उत्पन्न बाजार समितीचे मावळते उपसभापती प्रभाकर रौंदळ यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी बाजार समितीच्या सभापती सौ. सुनिता ज्ञानेश्र्वर देवरे यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती पदासाठी शनिवार (दि. ४) रोजी बाजार समितीच्या सभागृहात निवडीची प्रक्रिया घेण्यात आली.
आमदार दिलीप बोरसे व प्रशांत बच्छाव यांच्या सुचनेनुसार सभापती निवडी प्रमाणेच उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध करण्या साठी यावेळी बाजार समितीचे संचालक श्रीधर कोठावदे यांनी प्रकाश देवरे यांची उपसभापती पदासाठी सुचना केली. त्याला संचालक संजय बिरारी यांनी सर्वानुमते अनुमोदन दिल्याने प्रकाश देवरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्छाव, सभापती सुनिता देवरे, मावळते उपसभापती प्रभाकर रौंदळ, सचिव भास्कर तांबे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सटाणा ग्राहक संघाचे नवनिर्वाचीत सभापती अरविंद सोनवणे आणि भाजपाच्या जनकल्याणकारी योजना प्रसार व प्रचार अभियानाच्या जिल्हा  ध्यक्षपदी बिंदूशेठ शर्मा यांची निवड झाल्याने बाजार समितीच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या निवडीप्रसंगी बोलतांना देवरे म्हणाले मला मिळालेल्या कार्यकाळात बाजार समितीत व्यापारी वर्गाशी चर्चा करून वेळोवेळी शेतकरीहीताचे निर्नय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामानिक प्रयत्न करीन. यावेळी सभापती सुनिता देवरे, मावळते उपसभापती प्रभाकर रौंदळ संचालक संजय देवरे, नरेंद्र अहीरे, संजय सोनवणे, श्रीधर कोठावदे,संजय बिरारी, सरदारसिंग जाधव,पंकज ठाकरे, जयप्रकाश सोनवणे,केशव मांडवडे, मधुकर देवरे, तुकाराम देशमुख,संदिप साळे, संचालीका रत्नमाला सुर्यवंशी, वेणूबाई माळी ,सचिव भास्कर तांबे आदींसह नगर परिषदेचे आरोग्य सभापती दिनकर सोनवणे, विरगांवचे सरपंच ज्ञानेश्र्वर देवरे, मुन्ना सुर्यवंशी,सुभाष सोनवणे, किरण सोनवणे, किरण अहीरे, विनोद अहिरे, मंगेश पवार आदींसह देवरे यांचे समर्थक उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय अजबादादा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यकर्त्यानी फटाके फोडून गुलाल उधळून आनंद साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here