दिलासादायक : नाशिक पिंपळगाव बसवंतचे दोन रुग्ण कोरोना मुक्त !

0

वेगवान न्यूज / समीर पठाण
लासलगाव –

लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर मधून पिंपळगाव बसवंत येथील २५ वर्षीय महिला व सहा वर्षांचा बालक या दोन व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.लासलगाव कोविड सेंटरमधून या दोघांवर पुष्पवृष्टी करून व टाळ्या वाजून त्यांना हसत मुखाने निरोप देण्यात आला.

या रुग्णांना सोडते वेळी रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण करून या रुग्णवाहिकेतून त्यांना घरी सोडण्यात आले.तसेच आज रोजी लासलगांव कोविड सेंटरला पिंपळगाव बसवंत येथील सात,चांदोरी येथील एक व बेहेड येथील एक रुग्ण कोरोना वर उपचार घेत असल्याची माहीती कोविड सेंटर प्रमुख डॉ राजाराम शेंद्रे यांनी दिली

या वेळी कोविड सेंटर प्रमुख डॉ राजाराम शेंद्रे, लासलगाव ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ बाळकृष्ण अहिरे,कोविड नर्सिंग इन्चार्ज श्री तनपुरे,ज्ञानेश्वर शिंदे,रामू जाधव, संतोष निर्भवणे,शिंदे मामा,दत्तू शिंदे,गणेश भवर, दिलीप जेऊघाले,सोनवणे सिस्टर,कोळी सिस्टर आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here