सटाणा ( नाशिक ) शहरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह

0

वेगवान न्यूज

सटाणा (नाशिक) शहरात पुन्हा दोन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . सटाणा शहरातील दोन व्यक्तींमध्ये कोरोनाची सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांचे स्वब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता दोघांचा कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे .

सटाणा शहराच्या मध्यवर्ती भाग म्हणजे चावडी चौक जवळ असलेल्या महात्मा गांधी रोड परिसरात आज ०२ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही रुग्णांवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
सटाणा शहरात मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच चावडी चौक, गांधी चौक या परिसरात पहिल्यांदाच रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here