नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

1

लासलगांव – शिरवाडे ता. निफाड येथील प्रमोद सोपान सोनवणे या १९ वर्षीय युवकाने आज पहाटेच्या सुमारास लुगड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर वृत्त असे की,येथील प्रभावतीनगर या आदिवासी वस्तीत विमल सोपान सोनवणे या आई व दोन मुलांसह राहतात.आज पहाटेच्या सुमारास मयताच्या आजी आशाबाई माळी यांच्या प्रमोदने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.याबाबत त्यांनी तातडीने पोलीस पाटील यांना कळविले.पोलीस पाटील रामनाथ तनपुरे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला खबर दिली.त्यांच्या खबरीवरून लासलगाव पोलीस स्टेशनला र.जि. नंबर ३७/२०२० आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

घटनास्थळावर लासलगावचे पो.कॉ.इरफान शहा,एस.एस.इप्पर,पो.शिपाई दत्तात्रय कोळपे यांनी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाडच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला.स.पो.नि.खंडेराव रंजवे,पोलीस निरीक्षक राम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.एच.सी.उंबरे,पो.कॉ. इरफान शहा अधिक तपास करत आहेत.
शिरवाडे वाकद परिसरातील आठ दिवसात ही तिसरी आत्महत्येची घटना असून,येथील भाची व महालखेडा येथील रहिवासी एक युवतीच्या हत्येची चौथी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपळगाव शहरातील कादवा नदी पात्रातील

पाण्यात बुडून १९वर्षीय विनायक रवींद्र सोनवणे नामक युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली.याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रविवारी दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास शहरातील कादवा नदी पात्रातील एक व्यक्ती पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेतला असता तीन वाजेच्या सुमारास शहरातील शास्त्री नगर येथील १९ वर्षीय युवक विनायक सोनवणे यांचा मृतदेह मिळून आल्याने याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह प्रमोद देवरे अधिक तपास करत आहे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here