महाराष्ट्रातील दोन शहरं सुर्यामुळे तापले

0

नागपूरः

 मागील दोन आठवडय़ापासून सूर्य चांगलाच कोपला आहे. हवामान निरीक्षण संकेतस्थळ अल डोरादोनुसार, गेल्या २४ तासांतील जगातील सर्वाधिक उष्ण १५ ठिकाणांमध्ये भारताच्या तब्बल दहा शहराचा समावेश आहे.

जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहराचा समावेश आहे. तसेच भारतासह पाकिस्तानमधीलही उष्ण ठिकाणाचा यामध्ये सहभाग आहे.

काही ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले आहे.‘वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारताचे लगतचे भाग यांवर उत्तर-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे सध्याची उष्णतेच्या लाटेची परिस्थिती येत्या २४ तासांमध्ये कायम राहण्याची मोठी शक्यता आहे. नागुपूरमधील सोनगांव आणि ४६.५ डिग्री सेल्सिअस तापमानासह अकोला यांचा क्रमांक लागला आहे.

राजस्थानमधील चूरू देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण असल्याची नोंद बुधवारी झाली आहे. चुरू राजस्थानची राजधानी जयपूरपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहे. मंगळवारी चुरूचे तापमान ५० डिग्री सेल्सिअस होतं. चुरूला थार रेगिस्तानचं प्रवेशद्वारही म्हटले जातेय. पाकिस्तानच्या जेकबाबाद आणि भारताच्या चुरूचं तापमान जमिनीवरील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून मंगळवारी नोंद झाली.

बीकानेर, गंगानगर आणि पिलानी राजस्थानमधील अन्य तीन शहरं आहेत. ज्यांचा जगातील सर्वाधिक १५ उष्ण ठिकाणामध्ये सहभाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here