Tiktok स्टार सिया कक्कर आत्महत्येचा पुरावा सापडला !

0

मुंबई l बुधवारी रात्री 9.30 वाजता गीता कॉलनीमधील एका रुग्णालयातून सियाच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळाली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतनंतर 16 वर्षीय टिकटॉक स्टार सिया कक्कर टोकाचं पाऊल उचलत बुधवारी आयुष्य संपवलं.

यावेळी पोलिसांना सियाच्या खोलीतून काही महत्त्वपूर्ण कामगदपत्र, लॅपटॉप, कादगपत्र ताब्यात घेतली आहेत. तर सियाचं पार्थिव शवविच्छेदन अहवालानंतर कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सियाला काही दिवसांपासून सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या धमक्यांमुळे सियानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचंही सांगितलं जात आहे. अशी माहिती कुटुंबातील सूत्रांकडून एका वृत्तसाईटला देण्यात आली.

सियानं आत्महत्या केल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कमी वयात 16 वर्षी सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळवली होती. टिकटॉकवर लाखो तर इन्स्टाग्रामवर 98 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सियानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सियाच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here