विजेची तार तुटून तीन गायींचा मृत्यू,शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान…

0

वेगवान न्यूज / शरद शेळके

सिन्नर l शेतात चरणाऱ्या तीन गाईंना विजेचा शॉक लागून तीनही गायी जागीच दगावल्याची घटना तालुक्यातील दातली-माळवाडी शिवारात दि,१५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार माळवाडी येथील शेतकरी नामदेव रामचंद्र आव्हाड यांची जनावरे  दातली शिवारात समृद्धी महामार्गलगत चरत असताना आधीच कमकुवत झालेली तसेच लोंबकळत असणारी विजेची तार वार्‍यांच्या जोराने तुटून खाली चरणाऱ्या गायींवर पडल्याने तीन गायींचाचा जागीच मृत्यू झाला. तीनही गायी साठ हजाराहून अधिक किमतीच्या असल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान नैसर्गिक संकटामुळे आधीच जेरीस आलेल्या आव्हाड यांचे लाखमोलाचे पशुधन वीज हानित ठार झाल्याने ते अधिकच संकटात सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच दातलीच्या तलाठी हर्षला पाटील आणि संबंधित कृषी विभागाचे अधिकारी यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

सदर शेतकऱ्याची परिस्थिती हलाखीची असल्याने संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह गाईच्या दुधाच्या पैशावर होत असून आव्हाड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here