पाकिस्तानला वाटते ही भिती, पाकिस्तानच्या मनात काय सुरु

0

वृत्तसंस्था

इस्लामाबाद:  पाकिस्तानला सध्या वेगळीच भीती सतावत आहे. चीनसोबतच्या सीमावादारून विरोधकांचं लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल, अशी भीती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशींनी व्यक्त केली आहे.

भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं लडाख सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे.

चीनकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन कर्मचारी हेरगिरी करताना आढळल्यानं भारताकडून हे आदेश देण्यात आले.

त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ‘जियो पाकिस्तान’ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. ‘चीनसोबतच्या सीमावादावरून लक्ष हटवून ते पाकिस्तानवर केंद्रीत व्हावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत,’ असं कुरेशी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here