मावशीच्या नव-याने केलं हे कृत्य..

0

धुळे

धुळे येथील रहिवाशी असलेली पीडित तरुणी लॉकडाउनच्या काळात मुंबईतील परळ येथील आपल्या मावशीच्या घरी आली होती. याचा गैरफायदा घेत तिच्या मावशीच्या नवऱ्याने अर्थात काकाने तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. जेव्हा जेव्हा घरातील लोक बाहेर जात होते तेव्हा तो आपल्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार करत होता. ऑगस्ट ते ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या काळात अनेकदा या आरोपीने आपल्या भाचीसोबत हे अमानुष कृत्य केलं. तसेच पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर याचं आपण व्हिडिओ चित्रीकरण केलं असून कुणाला याबाबत सांगितल्यास व्हिडिओ सगळीकडे प्रसारित करुन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर अनेकदा अत्यार केला, असं पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे.

पोलिसांनी आरोपी काकाविरोधात झिरो एफआयआर दाखल करत ती भोईवाडा पोलिसांकडे बदली केली. कारण गुन्हा त्यांच्या हद्दीत घडला होता. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी बलात्कारप्रकरणी कलम ३७६ आणि बाल अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात पोक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पीडित मुलगी नुकतीच धुळ्याला आपल्या घरी परतली यावेळी आपल्या पोटात दुखत असल्याचे तिने पालकांना सांगितले. त्यानंतर तिला तपासणीसाठी दवाखान्यात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेत याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here