निफाड तालुक्यातील उगाव शिवारात घरफोडया करणारे चोरटे १२ तासात जेरबंद

1

लासलगावः

दिनांक २९ जुन २०२० रोजी मध्यरात्रीचे सुमारास निफाड पोलीस ठाणे हद्दीत ऊगाव शिवारात अज्ञात चोरटयांनी संभाजी राजे व्यापारी संकुलमध्ये समाधान पानगव्हाने यांच्या नवीनच असलेले श्रीराम हार्डवेअर दुकानाच्या भिंतीला होल पाडुन घरफोडी चोरी करीत असतांना कोणताही मुद्देमाल न मिळाल्याने दुकानास आग लावुन पेटवुन देवुन दुकानातील फर्निचर व विक्रीसाठी ठेवलेले हार्डवेअर असा एकुण ५० लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जाळुन नुकसान केले होते तसेच साक्षीदार रामप्रसाद ढोमसे यांच्या कृषी दुकानातील देखील ५० लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जाळुन नुकसान केले असुन उगाव गावातील रामकृष्ण हरी टेंडर्सलक्ष्मी प्रिंटींग प्रेस ,सुदर्शन वायरींग,सुमन दुध डेअरी व झाकीर पठाण यांचे मटन शॉप या बंद दुकानांचे कडीकोंडे व कुलूप तोडुन रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेली आहे.तसेच सदर आरोपीनी जावेद शेख रा.उगाव यांचे बंद घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून किचनमधील एचपी कंपनीचे दोन गॅस सिलेंडर व कपाटातील २५ हजार रूपये रोख असा माल घरफोडी चोरी केला आहे .

सदर घटनांबाबत निफाड पोलीस ठाण्यात भादवि ४३६,४५७,३८० आणि भादवि ४१४,४५,९७,३८० प्रमाणे तात्काळ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व निफाड पोलीसांनी सदर गुन्हयांचा तपास सुरू केला . स्थागुशाचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील व निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या पथकांनी घटनास्थळांवरील दुकानांना तात्काळ भेटी देवुन  पाहणी केली.

अज्ञात आरोपींचे गुन्हा करण्याचे कार्यप्रणालीवरून गुन्हेगार हे निफाड तालुक्यातीलच असल्याचा तर्क लावुन तपास सुरू केला.दरम्यान दि ३०/०६/२०२० रोजी तपासात असतांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थागुशाचे पथक व निफाड पोलीसांनी ऊगाव गावातील संशयीत बाळा भास्कर गांगुर्डे उर्फ गांधी,वय २१, रा . उगाव,ता.निफाड यास उगाव रेल्वे स्टेशन परिसरातुन ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेले संशयीतास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने त्याचा साथीदार जयेश एकनाथ ठेंगे,वय २८ रा.निमगाव वाकडा,ता.निफाड याच्यासह वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

यातील आरोपी जयेश ठेंगे यास निमगाव वाकडा परिसरातुन ताब्यात घेण्यात आले असुन सदर आरोपीच्या कब्जातुन वरील गुन्हयांतील घरफोडी चोरी करून नेलेले एच.पी.कंपनीचे ०२ गॅस सिलेंडर,रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली स्लेंडर मोटर सायकल एमएच – १५ – ईयु -८९७१ असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.यातील आरोपी बाळा गांगुर्डे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी घरफोडी व मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहे.स्थागुशाचे पथक व निफाड पोलीसांनी वरील दोन्ही आरोपींना १२ तासात ताब्यात घेवुन गुन्हे उघडकीस आणलेले आहे .

स्थागुशाचे सपोनि स्वप्निल राजपुत,सपोउनि रविंद्र शिलावट,पोहवा नंदु काळे,पोना सागर काकड,राजु सांगळे,हेमंत गिलबिले,पोकॉ प्रदिप बहिरम,गौरव पगारे तसेच निफाड पोलीस ठाण्याचे सपोउनि व्ही.बी.निकम , पोना संदिप निचळ यांच्या पथकाने वरील गुन्हे उघडकीस आणलेले आहे .

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here