“माझ्याबद्दल प्रसारमध्यमात फार वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत” रिया चक्रवर्तीने अखेर मौन सोडलं

0

मुंबई | सुशांत राजपूतसह लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या रियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास नव्या वळणावर जाऊन पोहचला आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर रियाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. रियावर करण्यात आलेल्या आरोपांवर तीनं अखेर मौन सोडलं आहे.

सोशल मीडियावर रियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये रिया म्हणतेय की, माझा देवावर व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल.माझ्याबद्दल प्रसारमध्यमात फार वाईट पद्धतीनं गोष्टी बोलल्या जात आहेत.

मात्र माझ्या वकिलांनी याबाबत बोलण्यात स्पष्ट मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. लवकरच सत्य सर्वांच्या समोर येईल, असं मतही रियानं या व्हिडीयोतून व्यक्त केलं आहे.दरम्यान, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी देखील सुशांतची गर्लफ्रेंड रियाची इडीकडून चौकशी केली जाणार आहे.

रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करावी, अशी सूचना ईडीकडून बिहार पोलिसांना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here