थिएटर मालकांचे ‘अनलॉक 5’कडे लागले डोळे!

0

मुंबई l 1 ऑक्टोबरपासून अनलॉक 5 सुरू होत असल्याने तेव्हा तरी थिएटर सुरू करण्यास परवानगी मिळेल का, याकडे आतापासूनच थिएटर मालकांचे लक्ष लागले आहेत.लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व गोष्टी पूर्ववत होतायत. मात्र 23 मार्चपासून बंद असलेले थिएटर अद्याप उघडलेले नाहीत.

30 सप्टेंबरला अनलॉक 4 संपत असल्याने येत्या काही दिवसांत अनलॉक 5 साठी नवीन नियमावली केंद्र सरकार जाहीर करू शकते. अनलॉक 5 मध्ये तरी थिएटर सुरू करण्यास परवानगी मिळेल अशी आशा सिंगल स्क्रीन तसेच मल्टिप्लेक्स चालकांना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीकर प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमावली तयार करून त्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारला पाठवला आहे.

मात्र थिएटर पुन्हा सुरू झाल्यावर प्रेक्षकांना आपल्याकडे वळवणे त्यांच्यापुढे मोठे आव्हान असल्याने सोशल डिस्टन्सिंग, मास्क, पेपरलेस तिकीट, दोन शो मध्ये ठराविक अंतर, सिनेमा हॉल आणि खुर्च्यांची दररोज साफसफाई असे बदल सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येणार आहेत.

30 टक्के थिएटर बंद होण्याच्या मार्गावर!

बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, लॉकडाऊनमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे सध्या 30 टक्के थिएटर बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यात सिंगल स्क्रीन थिएटरची संख्या जास्त आहे. ऑक्टोबरपर्यंत थिएटर सुरू न झाल्यास त्यात आणखी भर पडू शकते. थिएटरमध्ये पुन्हा प्रेक्षकांची गर्दी खेचण्याचे काम ‘सूर्यवंशी’ आणि ’83’ हे सिनेमे करतील, अशी थिएटर मालकांना आशा आहे.

अमेरिका, चीन, दुबई आणि ब्रिटनसह अनेक देशांत थिएटर पुन्हा सुरू झाले आहे. बहुतेक ठिकाणी सिनेमा हॉलमधील प्रेक्षकांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. अनेक मल्टिप्लेक्समध्ये खाण्यास बंदी घातली आहे.

पीवीआर,आयनॉक्स, कार्निवल अशा मल्टिप्लेक्स चैन आपापल्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी उपाययोजना करत आहेत. त्यासाठी त्यांनी विशिष्ठ बजेट देखील निश्चित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here