करवा चौथचे व्रत करण्यास मनाई केली म्हणून इमारतीवरून महिलेने घेतली उडी

0

इटावा l करवा चौथसाठी उपवास करण्यास मनाई केल्याने महिलेने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील इटावा येथील सैफई वैद्यकीय विद्यापाठामध्ये ही घटना घडली. महिलेची कोरोना झाल्याने दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेने टोकाचं पाऊल उचललं.

कोरोनाची लागण झालेल्या महिलेला करवा चौथचा उपवास करण्यास मनाई केल्याने तिने टोकाचा निर्णय घेतला आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असलेल्या महिलेला रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तिला करवा चौथसाठी उपवास करण्यास मनाई केली होती. त्यामुळे उपवास करण्यास मनाई केल्याने या महिलेला उपवास करता आला नाही. म्हणून या महिलेने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही महिला मेंदूच्या आजाराने ग्रस्त होती.

त्यामुळे तिला २७ ऑक्टोबरला महिलांच्या न्यूरो-सर्जरी विभागात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, २९ ऑक्टोबरला तिची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तेव्हा तिला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील आयसोलेशन वॉर्ड मध्ये हलविण्यात आले होते. तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here