वाईटःरेप ला विरोध करणा-या शालेय मुलीस पेटवून दिले

0

वृत्तसंस्थाः छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने बलात्काराचा प्रयत्न उधळून लावल्यामुळे दोन शालेय विद्यार्थ्यांनी सदर मुलीस पेटवून दिले. यामध्ये मुली 80 टक्के भाजली असून तीच उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी पीडित विद्यार्थीनीने गावातील दोन तरुणांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. रायपूर पोलिसांनी याप्रकरणी झिरो एफआयआर दाखल केली आहे.आरोपी पीडित विद्यार्थ्यीनीच्या शाळेतीलच वरच्या वर्गातील विद्यार्थी आहेत. यातील एक अल्पवयीन आहे. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिलं आहे.

२२ जून २०२० रोजी ही घटना घडली. या दिवशी पीडित मुलगी तिच्या घरापासून जवळच असलेल्या शेतात काम करीत होती. यावेळी या मुलीच्या घरी कोणीच नव्हते. यावेळी आरोपी या मुलीला जबरदस्तीने तिच्या घरात घेऊन गेले आणि त्याच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मुलीने त्यांना जोरदार विरोध केला. धक्कादायक बाब म्हणजे मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडल्याने त्या मुलांनी तिला पेटवून दिले.

य़ा घटनेनंतर शरद जैसवाल नावाचा एक सज्ञान आरोपी दुसऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलासह घटनास्थळावरुन पळून गेला. घरातील व्यक्ती आल्यानंतर  तिला शोधायला सुरुवात केली तेव्हा ती शेतात जळालेल्या स्थितीत बेशुद्धावस्थेत पडलेली आढळून आली. यामध्ये ती ८० टक्के भाजली होती. तील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असतांना तीच मृत्यू झाला. पास्को कायद्या अंतर्गत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here