पोलीस स्टेशन हादरलं ! ‘एका तासाच्या आत पंतप्रधान मोदींना गोळया घालून ठार करेन….

0

नोएडा l पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका तासाच्या आत गोळी घालून ठार करेन अशी धमकी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून दिली. या व्यक्तीनं पोलिसांना 100 क्रमांकावर फोन करून एक तासाच्या आत पंतप्रधान मोदींना गोळ्या घालून ठार करेन अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.पोलीसानी लगेचच या इसमाचा फोन ट्रॅक करून त्याला अटक केली आहे .या इसमानं लखनऊ पोलिसांना आधी फोन केला.

या फोननंतर लखनऊ पोलिसांनी लगेचच नोएडा पोलिसांना याबाबत माहिती दिला. या इसमाचा फोन ट्रॅक करत त्यांनी आरोपीला मामूरा गावातून अटक केली. सध्या पोलीस या इसमाची चौकशी करत असून, त्याचा अटक करण्यात आली तेव्हा तो दारूच्या नशेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस उपायुक्त हरीश चंदर यांनी सांगितले की, सोमवारी 112 वर फोन आला, आणि एका व्यक्तीनं एका तासाच्या आत पंतप्रधानांना गोळ्या घालेन, तसेच तसेच नोएडाला उडवून देण्याची धमकी दिली.या आरोपींने फोनवर शिवीगाळही केला. यानंतर हा फोन 112 मुख्यालय लखनऊ येथून नोएडा पोलिसांना तातडीने पाठविण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मामूरा गावातून हरभजन सिंग नावाच्या-33 वर्षीय तरूणाला अटक केली.मुळचा हरियाणाचा असलेला आरोपी सध्या नोएडाच्या सेक्टर -66 मध्ये राहत होता. त्यांच्याकडे चौकशी केली जात असल्याचे पोलिस उपायुक्त म्हणाले. त्याने असा फोन का केला याबाबत चौकशी केली जात आहे. तसेच, अटकेच्या वेळी आरोपी नशेत होता, असेही पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here