राज्यात कोरोना बाधितांची संख्या पोहचली 1 लाख 42 हजारावर

0

मुंबई : राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे, राज्यातील नव्या रुग्णांची संख्या रोज नवा उच्चांक गाठत आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात 3 हजार 890 नवे रुग्ण समोर आले आहेत. यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे, आज तब्बल 4 हजार 161 करोनाबाधित ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्यात आज 3,890 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1,42,900वर पोहोचली आहे. आज नवीन 4,161 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 73,792 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण 62,354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत”.
वसई – विरार शहरात आज 105 नवे कोरोनाचे रूग्ण आढळले.अकोला : अकोल्यात कोरोनामुळे दिवसभरात चौघांचा मृत्यू, ६५ जण पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या १३०९.ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 1182 नवे रुग्ण, तर 29 जणांचा मृत्यू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here