नाशिक जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या पोहचली 1108 वर

0

नाशिकः

आज नाशिक जिल्ह्याभरात नव्याने 50 रूग्णांची भर पडली. यात ग्रामिण भागातील 2, जिल्ह्याबाहेरील 3, नाशिक शहरातील 13 तर मालेगावच्या 32 रूग्णांचा सामावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या 1108 वर पोहचली आहे. तर आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील एकुण 277 अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले. यात 171 निगेटिव्ह तर 50 पॉझिटिव्ह आढळले. यात नाशिक शहरातील कामठवाडे येथील 5, भद्रकाली दुध बाजार 1, अजमेरी चौक 1, नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौक 2, वडाळा 1, जत्रा हॉटलेजवळ 1 , मखमलाबादरोड 1 असे रूग्ण आहेत. यामुळे नाशिकशहराचा आकडा 152 वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील आज केवळ 3 रूग्ण आढळून आले आहेत. यात नांदगाव येथील 1, दिंडोरी 1 व ओझर येथील 1 यांचा सामावेश आहे. तर यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 160 झाला आहे.तर मालेगाव शहरातील 26 रूग्ण पॉझिटिव्ह आले असून यात 3 मुंबई रेल्वे पोलीस व मालेगाव शहर पोलीस ठाण्यातील असे 9 पोलीस पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मालेगाव येथील रूग्णांचा आकडा 748 वर पोहचला आहेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here