पावसाचा कहर ! आंध्रात १० तर तेलंगणामध्ये १५ ठार ,घराबाहेर पडू नये…

0

हैदराबाद l आंध्र प्रदेशमध्ये जोरदार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांत १० जण ठार झाले, असे सरकारी अधिकाºयाने सांगितले. जोरदार पावसामुळे रस्त्यांची मोठी हानी झाली व अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे गेल्या २० दिवसांत दुसºयांदा कृष्णा नदीला बुधवारी पूर आला.

अधिकाºयांच्या बैठकीत आढावा
६.४६ लाख क्युसेक पाणी आंध्र प्रदेशमधील प्रकासम धरणातून सोडले जात असल्यामुळे दुसºयांदा सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे. या पाण्यामुळे धरणाच्या काठाला असलेल्या वसाहतींना धोका निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी परिस्थितीचा आढावा उच्च पातळीवरील बैठकीत घेतला. रेड्डी यांनी पीडित कुटुंबांना सानुग्रह अनुदानही जाहीर केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रेड्डी जिल्हाधिकाºयांशीही बोलले व त्यांना अतिदक्ष राहण्यास सांगितले.

तेलंगणा –

मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसामुळे हैदराबादेतील वेगवेगळ्या भागांत घरांच्या भिंती पडून मृत्यू झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने पावसाच्या पार्श्वभूमीवर येथील आऊटर रिंग रोडवरील बुधवारी आणि गुरुवारी सगळ्या खासगी संस्था, कार्यालये, जीवनावश्यक नसलेल्या सेवांना सुटी जाहीर केली आहे. पुढील दोन दिवसांत लोकांनीही राज्यात पावसाची शक्यता असल्यामुळे घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे.

हैदराबाद शहर आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांत झालेला जोरदार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांत १५ जण ठार झाले. पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर व सखल भागांत पाणी साचले. तेलंगणचे नगर विकास मंत्री के. टी. रामा राव, पशूधन विकास मंत्री तेलासानी श्रीनिवास यादव यांनी वरिष्ठ अधिकाºयांची तातडीची बैठक घेऊन मदत व बचाव कामाचा आढावा घेतला.

बुधवारी सकाळी येथील गगनपहाड वसाहतीत घर कोसळून मुलासह कुटुंबातील तीन जण मरण पावले. चंद्रयानगुट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन भिंती कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला. दुसºया एका घटनेत इब्राहीमपुºयात मंगळवारी रात्री महिला (४०) आणि तिची मुलगी घराचे छत अंगावर पडून मरण पावल्या. ग्रेटर हैदराबाद मनपा हद्दीत कमालीचा जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे अनेक भागांत पाणीचपाणी तुंबले. राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी सगळ््या जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांना अतिशय दक्ष राहण्याचे आदेश दिले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तुकडीने पूर आलेल्या अनेक वसाहतींतून अनेक कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here