3500 रुपयात आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देतयं लॅपटॉप ?

0

नवी दिल्ली l .सद्या देशात एका बातमीने धुमाकुळ घातला आहे. व्हायरल झालेल्या बातमीच्या मते, एमसीए कोव्हिड-19 ऑनलाइन शिक्षण अंतर्गत 8वी पासून पीयूसी 1 च्या विद्यार्थ्यांना 3500 रुपयात लॅपटॉप देत आहे. या खोट्या दाव्याची चौकशी जेव्हा पीआयबीने केली तेव्हा याबाबत सत्य उघडकीस आले. पीआयबीने हा दावा फेक ठरवला आहे.

या मागचं सत्य काय ?

सोशल मिडियावर (Social Media) एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs) विद्यार्थ्यांना 3500 रुपयात लॅपटॉप देत आहेत

भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ही जाहिरात खोटी ठरवली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने असे म्हटले आहे की, एमसीए कोव्हिड-19 ऑनलाइन एज्यूकेशन उद्देश्य याकरता लॅपटॉप प्रदान करत नाही आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी खोटी आहे.व्हायरल जाहिरातीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 3500 रुपयात लॅपटॉप खरेदी करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर आहे. अर्ज केल्यानंतर 30 दिवसात लॅपटॉप मिळेल. हे लॅपटॉप लावा, लेनोव्हो आणि एटीएस कंपनीचे असणार आहेत. ज्यामध्ये Windows 10 OS, Intel Atom Processor, 32GB HDD Storage, ATS, 2GB रॅम असेल.

या खोटारड्या जाहिरातीनुसार लॅपटॉपसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रं देखील गरजेची आहेत. आधार कार्ड, फोटो, विद्यार्थ्याचे आयडी कार्ड, पालकांचे आधार कार्ड, शिक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक द्यावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here