मुंबई – कांदिवलीच्या लालजी पाडा परीसरात खळबळजन्य प्रकार उघडकीस आला आहे.पित्याने कर्ज बाजारीपणाला कंटाळून व दोन मुलींची हत्या करून स्वता गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजगर अली जब्बार अली शेख असे मृताचे नाव आहे.
अजगर अलीचे पेंटोग्राफीचे युनिट आहे काल दुपारी अजगर अली हा एक अकरा वर्ष आणि एक पाच वर्षाच्या अशा दोन मुलींना घेऊन कारखान्यात आला. काही वेळ कारखान्यात तो थांबला. दुपारी त्याने पत्नीला फोन केला. त्यानंतर अजगर अलीने फोन बंद केला.अजगर अलीचा फोन बंद येत असून तो अद्याप घरी न आल्याने त्याच्या पत्नीने एका नातेवाईकाला फोन केला.
त्यानंतर नातेवाईकाने जाऊन पाहिले असता अजगरअलीने लोखंडी रॉडला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले.घटनास्थळी पोलिसांना त्याच्या दोन मुली बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्या तिघांनाही तातडीने उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्या तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली.