कोरोनाचे लक्षण दिसत असल्याने कुटूंबाने मृतदेह स्वीकाण्यास नकार दिल्याने प्रशासनाने केला अंत्यसंस्कार

0
वेगवान न्यूज / अमोल झाडे
वर्धा:-
    जिल्ह्यातील समुद्रपूर परिसरातील जाम येथील ४७ वर्षीय मृतदेहाची कोरोना चाचणी करणे व तीन दिवस तो मृतदेह शित पेटीत ठेवणे व त्याचे शवविच्छेदन करण्या करीता कुठे न्यायचा यावरून कित्येक तास मंथन करून मृतदेहवर शेवटी समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले यावेळी कुटुंबीयान कडून मृतदेह  स्वीकारण्यास नकार दिल्याने शेवटी सायंकाळी प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आला.
    जाम येथील  खाजगी वाहनावर चालक असलेल्या  बंडू गुलाब बागेश्वर वय ४७ वर्ष हा गेल्या दहा दिवसा पासून सर्दी खोकला व तापाने घरीच होता.या अगोदर तो चालक असलेल्या त्याचे इकडे तिकडे जाणे येणे सुरूच होते तो काही दिवसांपूर्वी बाहेर राज्यातून सुध्दा जाऊन आला होता.त्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागल्याने व छातीत दुखत असल्याने त्याच्या माताऱ्या आईने निबु पाणी दिले मात्र काही वेळातच मृत्यू झाला.
          त्याचे सर्व लक्षणे कोरोनाचे दिसत असल्याने त्याला कोरोनाचे चाचणी करिता स्वाब घेऊन तीन दिवस रिपोर्ट येत पर्यंत शीतपेटीत ठेवायचे होते. यावेळी रुग्णवाहिका बोलावली मात्र पी पी इ किट नसल्याने त्याला रुग्णवाहिकेत टाकायचे कुणी हा प्रश्न निर्माण झाला होता.
यावेळी रुग्णालयाचा कुणीही कर्मचारी किंवा आरोग्य विभागाच्या कर्मचारी मृतदेहाला हात लावत नाही त्या मुळे नागरिका समोर अडचण निर्माण होती.शेवटी समुद्रपूर  येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून त्याचा स्वाब घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले व सदर व्यक्ती ही गाव वाल्यांना कोरोना संशयित वाटत असल्याने  व मृतकाचे म्हातारी आई असल्याने मृतदेह स्वीकारन्यास नकार दिल्याने प्रभारी तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी निर्णय घेत त्याचा प्रशासनाचे वतीने अंतसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here