धुळेच्या त्या आदीवासी जोडप्याने टिक-टॅाकमधून केली 30 लाखांच कमाई

0

धुळेः 

चीन देशाने भारताचे 20 जवान शहीद केले यामुळे चीन व भारत या दोन देशांमध्ये संघर्ष सुर झाला. ज्या चीन -भारत सीमारेषावर 45 वर्षात एक गोळी चालली नाही त्या ठिकाणी भारताच्या 20 जवानान वीर मरण आले. त्यामुळे चीन देशाकडून भारताला धोका असल्यामुळे सायबर हल्ला होण्याच्या भीतने भारताने चीनचे 59 एप बंद केले

यात टिक टाॅक हे जास्त पंसदीचे अप असल्यामुळे टिकटॉक स्टार चिंतेत पडले. एवढचं नाही तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोन बायकांचा प्रपंच असलेल्या दिनेश पवार यांनी टिक टाॅक मधून 30 लाखांची कमाई केली होती. याबातमीमुळे माझ्या दोन्ही बायका ढस ढसा रडल्या असल्याची भावना दिनेशने व्यक्त केली.  या निर्णयानंतर धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध टिकटॉककर दिनेश पवार यांच्याविषयीचं वृत्त द प्रिंटनं दिलं.

दिनेश व लाखनी पवार हे धुळ्यात राहतात. गरीब असली तर कलेची श्रीमंती फार मोठी आहे. कोणाच्या डोळ्यात खुपनारी ही कलेची श्रीमंतीने दिनेश व लाखानी यांना टिक-टाॅकने स्टार केलं…घर सपराचे असून अत्यंत साधी राहणी मान असल्यामुळे ही जोडी टिक-टॅाकवर लोकांना चांगलीच भावली..

मोदी सरकारच्या टिकटॉकवरील बंदीच्या निर्णयानंतरच्या प्रतिक्रियेविषयी बोलताना दिनेश पवार म्हणाले,”आम्ही उद्ध्वस्त झालो, पण आम्हाला याचीही जाणीव झाली की, यात फक्त आम्हीच नाही. टिकटॉकवर बंदी आणल्याची बातमी बघून माझ्या दोन्ही इतरांप्रमाणेच ढसाढसा रडल्या. या बंदीच्या निर्णयामुळे आमच्यासारखे लाखो लोक दुखावले गेले आहेत. मात्र, आता आम्ही यू ट्यूबकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असं दिनेश पवार म्हणाले.

दिनेश पवार हे नव्वदच्या दशकातील बॉलिवूड सिनेमातील गाण्यावर नृत्य करून टिकटॉक व्हिडीओ बनवायचे. यातून त्यांनी ३० लाख रूपयांची कमाई केली आहे. पण, दिनेश पवार यांनी ३० लाख रुपये मिळाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून आम्हाला काहीही पैसे मिळायचे नाही. पण त्यामुळे आम्हाला प्रसिध्दीची हौस पुर्ण करण्यासाठी मदत झाली, असं त्यांचं म्हणणं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here