शहर हादरलं ! कोरोना टेस्ट केल्यानंतर २२९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले गायब l

0

नवी दिल्ली,लखनऊ : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 03 हजार 696 झाली आहे. यातील 5 लाख 79 हजार 357 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर 38 हजार 135 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. असाच धक्कादायक प्रकार लखनऊमध्ये घडला आहे.

लखनऊमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णांनी टेस्ट केल्यानंतर खोटे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला,यामुळे या रुग्णांबाबत माहिती मिळणे कठिण झाले आहे. सध्या पोलीस या रुग्णांचा शोध घेत आहे.

किती रुग्ण गायब झाले ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2290 कोरोना रुग्ण गायब झाल्याची शक्यता आहे. याती 1171 लोकांबाबत माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर 1119 रुग्ण अजूनही बेपत्ता आहेत. असे सांगितले जात आहे की 23 ते 31 जुलै दरम्यान या रुग्णांची चाचणी करण्यात आली.

कोरोना टेस्ट केल्यानंतर हे रुग्ण गायब झाले. जेव्हा प्रशासनाने त्यांचे नाव आणि पत्ती यांची तपासणी केली,तेव्हा ही माहिती खोटी असल्याचे समोर आले.पोलीस कमिश्नरने या रुग्णांना शोधण्याची जबाबदारी कोव्हिड-19 सर्व्हिंलस टीमला दिली आहे.

आतापर्यंत 1171 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्यांविरुद्ध चुकीची माहिती दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कमिश्नर सुजीत पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रोज हजारोच्या संख्येने रुग्णांची तपासणी केली जाते. यात काही रुग्ण फॉर्मवर आपली खोटी माहित देत असल्याचे समोर आले आहे. सध्या अशा रुग्णांचा शोध घेतला जात आहे.दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने रविवारी कोव्हिड-19 प्रोटोकॉलचे उल्लंधन केल्याप्रकरणी 189 लोकांकडून तब्बल 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here