या’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

0

मुंबईः

एकीकडे राज्य सरकार ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करत असताना करोनाचा फैलाव वाढत असल्याने भिवंडीत १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३० जूनपर्यंत कायम असणार आहे. यादरम्यान अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्याच्या हेतूने राज्य सरकारने काही निर्बंध शिथील केले आहेत.परंतु कोरोनाची संख्या वाढू लागल्यामुळे

१८ जून ते ३ जुलैपर्यंत भिवंडी शहर पूर्पणणे बंद असणार आहे. करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रशासनाने कठोर लॉकडाउन जाहीर केला आहे.

भिवंडी शहरात दाटीवाटीची वस्ती असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण होत आहे. करोनाचा फैलाव वाढत असल्याने महापौर प्रतिभा पाटील यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांचा क़डक लॉकडाउन जाहीर केला पाहिजे असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनीच पाठिंबा दिला. आयुक्तांनीही यासाठी परवानगी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here