लेकाला बोटीत ठेवून तलावात उतरलेल्या त्या अभिनेत्रीचा मृतदेह सापडला !

0

कॅलिफोर्निया l 33 वर्षीय हॉलिवूड अभिनेत्री नाया 8 जुलै रोजी तिच्या 4 वर्षाच्या मुलासोबत वेंचुरा काऊंटीमधील पीरू लेकमध्ये फिरायला गेली होती.तब्बल 5 दिवसांनी पिरू लेकमध्ये गायब झालेल्या नायाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना सोमवारी यश आले. भाड्याच्या बोटीत तलावाची सैर करत असताना अचानक नायाने पोहण्यासाठी तलावात उडी घेतली.

यानंतर ती परत आलीच नाही. तिचा चार वर्षांचा मुलगा जोसी एकटाच बोटीत आढळला होता. नाया लेकमध्ये वाहून गेली असणार, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे शोधकार्य लेकच्या आसपासच सुरू ठेवले होते. वेंच्यूरा कंट्री पोलिसांनी याबाबत काही व्हिडीओ देखील शेअर केले होते.

अखेर पाचव्या दिवशी वेंच्यूरा येथील कोरोनर कार्यालयापासून 64 किलोमीटर दूर नायाचा मृतदेह सापडला. यासंदर्भात नायाच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. लॉस एंजलिसपासून तासाभराच्या अंतरावर हा तलाव आहे. रोबोटिक डिव्हाइसच्या मदतीने गेल्या 5 दिवसांपासून याठिकाणी काही डायव्हर्स नायाचा शोध घेत होते. त्याचप्रमाणे ड्रोनच्या माध्यामातून देखील नायाचा शोध सुरू होता.

नाया तिच्या 4 वर्षाच्या मुलाबरोबर तलावामध्ये फिरण्यासाठी जाण्याआधीचे एक सीसीटीव्ही फुटेज शनिवारी समोर आले होते. अभिनेत्री तलावाकाठी तिचा मुलगा गाडीतून उतरताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार वेन्चूरा कंट्री पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here