नाशिक जिल्ह्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह l

0

वेगवान न्यूज/ मनोज वैद्य
दहिवड(१३ जानेवारी) देवळा तालुक्यातील खामखेडा जवळील मांगबारी घाटात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकत असल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत माजी सरपंच संजय मोरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात सदर घटनेची खबर दिली.देवळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता यावेळी एका अनोळखी ५० वर्षा चा इसम झाडाला लटकून असल्याचे निदर्शनास आले.

सदर व्यक्तीने साधारणत १० ते १५ दिवसांपूर्वी गळफास घेतला असल्याने त्याचे शरीर संपूर्णपणे कुजले होते. त्याचा पंचनामा केला असता त्याच्या अंगात तपकिरी व फिकट तपकिरी रंगाचे जॅकेट,आतमध्ये पांढरे बटन व निळ्या पिवळ्या चेक्सचा फुल बाहीचा शर्ट,हाफ बाहीचा निळसर बनियन,निळसर काळपट जीन्स पॅन्ट,हिरव्या कलरची अंडरपॅड,कमेरला काळा करदोडा,गळ्याला गुलाबी हिरव्या रंगाचे उपरणे गळफास घेतलेले, पायात प्लॅस्टिकच्या काळया चपला असे आढळून आले आहे. मृतदेहाची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे देवळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.निखिल पाडवी यांनी घटनास्थळीच प्रेताचे शवविच्छेदन केले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने सदर व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर अज्ञात मृतदेहाविषयी कुणाला काही माहिती असेल तर त्यांनी ०२५९२-२२८२३३ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर,पोलीस कर्मचारी बाळू पवार,सुदर्शन गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here