35 वर्षीय पत्नीला दीड वर्षे शौचालयात डांबून ठेवले

0

पानिपत l महिला आणि बाल कल्याण अधिका-यांनी एका महिलेची अत्यंत वाईट अवस्थेत सुटका केल्याची घटना घडली आहे.चौकशीमध्ये मागच्या दीडवर्षांपासून महिलेला अशाच पद्धतीची अमानवीय वागणूक मिळत असल्याचे समोर आले. हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण –

एका 35 वर्षीय महिलेला तिच्या पतीने तब्बल दीड वर्षांपासून शौचालयात कोंडून ठेवले होते. पानिपत जिह्यातील रीशपूर गावामध्ये ही महिला राहते. या महिलेची सुटका केली, तेव्हा तिची अत्यंत वाईट अवस्था होती.पीडित महिला तीन मुलांची आई आहे. जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाच्या पथकाने बुधवारी एका अत्यंत छोटय़ाशा शौचालयातून या महिलेची सुटका केली.

शौचालयाचा दरवाजा उघडला तेव्हा, महिला तिथे खाली निपचित पडलेली होती. तिची अत्यंत वाईट अवस्था होती, असे जिल्हा महिला आणि बाल कल्याण अधिकारी रजनी गुप्ता यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here