कोविड -19 प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स

0
संग्रहीत

 मुंबई

:-  कोविड -19 विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्कफोर्स नेमण्यात येणार आहेत. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, या क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा समावेश करण्यात येणार असून कोविड -19  नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे व त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स  काम करेल.

            जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत कळविण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत. राज्यात सध्या साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल असेही श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here