सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : बदनामी करण्यासाठी हजारो फेक अकाऊंट केले होते तयार…..

0

मुंबई l अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले होते. मुंबई पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर हजारो बनावट खाती तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.भाजप नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करून अनेक आरोप केले होते. याच दरम्यान, सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकार आणि पोलिसांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर हजारो फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते.सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक, ट्वीटरवर हजारो अशी फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते.

या अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. यात अत्यंत खालच्या थराला जाऊन पोस्ट करण्यात आल्या आहे.या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या सर्व अकाऊंटचा मुंबई सायबर सेल तपास करत आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहे. यात दुसरा गुन्हा हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी करण्याबद्दल दाखल करण्यात आला. परमबीर सिंह यांचा फोटो मार्फ करून वापरण्यात आला होता. त्यांच्या फोटोवर असभ्य भाषेत टीका करण्यात आली होती.दैनिक हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 80 हजार फेक अकाउंट तयार करण्यात आले होते.

या फेक अकाऊंटच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेक पोस्ट करण्यात आल्या होता. यामध्ये #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR अशा हॅशटॅगचा वापर करून सरकारविरोधात मोहिम राबवण्यात आली होती.पोलिसांनी Information Technology Act अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here