हे तुम्हाला माहीत आहे का? नग्नावस्थेत सापडला होता सुशांतच्या EX-मॅनेजरचा मृतदेह

0

मुंबई l काही दिवसांपासून सुशांत आणि त्याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) हिच्या आत्महत्येचे कनेक्शन लावण्यात येत आहे. दिशाने 8 जून रोजी तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. या अहवालामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणामध्ये रोज नवे कांगोरे समोर येत आहेत. दरम्यान याशिवाय आणखी धक्कादायक बाब समोर येत आहे, ती म्हणजे दिशाचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडीओ समोर येत आहेय 8 जूनचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये दिशा तिच्या काही मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी करताना दिसत आहे.

दिशाने एका व्हॉट्सअॅप ग्रृपमध्ये हा व्हिडीओ पाठवला होता. या व्हिडीओमध्ये स्वत: दिशा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. 8 जूनला रात्री जवळपास 12 वाजण्याच्या सुमारास हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे हा व्हिडीओ शूट केल्यानंतर साधारण तासाभरातच दिशाने आत्महत्या केली होती. त्यादिवशी दिशा तिचा होणार नवरा आणि काही मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी करत होती.या व्हिडीओमध्ये ती खूप आनंदात देखील दिसत होती. असे असताना ती आत्महत्येचे पाऊल कसे काय उचलू शकते असा सवाल उपस्थित होत आहे.दिशा सालिनच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल, ८ जूनला झाली होती पार्टी, पार्टीनंतर दिशाने केली होती आत्महत्या दरम्यान शवविच्छेदन अहवालात तिचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याचे नमुद केलेले असल्याने आणखी प्रश्नचिन्ह याप्रकरणात उपस्थित होत आहे.

दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावा देखील काही राजकीय नेत्यांकडून याआधी केला गेला आहे. ‘सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणाची ज्या दिशेनं चौकशी सुरू आहे. त्यातून कुणाला तरी वाचवण्यात येत आहे’ असा गंभीर आरोप भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला होता. तसंच,’सुशांतच्या मॅनेजर दिशाचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे’ असाही आरोप राणेंनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here