सोन्याच्या विक्रीत तुफान वाढ; पुन्हा सोन्याचे भाव वाढणार का?

0

पुणे l ‘गेल्या आठवड्यात दागिने खरेदीसाठी नागरिकांची विविध दालनाकडे विचारणा वाढली आहे. या आठवड्यात विक्रीत साधारणपणे 40 टक्के वाढ होत असल्याचे दिसून येत आहे’, अशी माहिती ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल या संस्थेचे अध्यक्ष अनंत पद्मनाभ यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत. अशातच नागरिकांनी सोने खरेदीकडे कल झुकवला आहे.

इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल या संस्थेचे अध्यक्ष अनंत पद्मनाभ यांनी पुढे सांगितले की, लवकरच विवाह समारंभाच्या तारखा येत असल्यामुळे विवाहासाठीचे दागिने आणि दसऱ्यासाठीचे दागिने एकाच वेळी खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल दिसून येत आहे. या वर्षी दागिन्यांच्या विक्रीत 60 ते 65 टक्के वाढ होईल अशी आम्हाला आशा आहे.येते काही महिने सोन्याचे भाव स्थिर राहतील. त्यात विशेष बदल होणार नाहीत, असा अंदाज सांगितला जात आहे. वर्षाच्या शेवटी मात्र भाव वाढू शकतात. डिसेंबरच्या अखेरीस सोन्यानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला असेल, असे मत सराफा बाजारातील व्यावसायिकांनी व्यक्त केले.

गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याचे दर 60 हजार रुपयांपर्यंत गेले होते. मात्र विविध देशातील औद्योगिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे आता सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

ग्राहकांना सोन्याचे दर यापेक्षा कमी होणार नाहीत असे वाटत असल्यामुळेही दसरा-दिवाळीच्या काळामध्ये सोन्याची खरेदी वाढेल, असे दागिने उत्पादकांना वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here